कोकणात चाललेली आंदोलनं विकासाच्या विरोधी नाहीत, तर त्यांनी जपलेल्या निसर्गाला ओरबाडण्याच्या विरोधात आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे

नाणार रिफायनरीबद्दल वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कोकणातल्या प्रदूषणकारी प्रकल्पांच्या विरोधातली आंदोलनं सगळ्यांसमोर आली आहेत. आधी जिंदालच्या जयगडच्या औष्णिक प्रकल्पाविरोधात आंदोलन पेटलं, मग जैतापूरवरून राजकारण, हिंसा सगळं झालं. काल जयगड, जैतापूर होतं, आता नाणार, बारसू सोलगाव आहे. सिंधुदुर्ग आणि गोव्यातले गावकरी मायनिंगविरुद्ध अजूनही लढा देतायत.......

करोना विषाणूचा फैलाव वटवाघळांमुळे नैसर्गिकरित्या झाला की, चीनमधल्या प्रयोगशाळेत हा विषाणू तयार झाला, या प्रश्नाची उत्तरं शोधताना रोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत

ज्या चीनमध्ये करोनाचा उद्रेक झाला, तिथेही वटवाघळांना शुभशकुन मानलं जातं. वटवाघळं ही भरभराटीचं प्रतीक आहेत, अशीही चिनी लोकांची धारणा आहे. पण तिथेही करोनामुळे वटवाघळांच्या अस्तित्वावर घाला आला आहे. करोनाच्या महामारीमध्ये काही ठिकाणी वटवाघळांना मारण्याच्या घटनाही घडल्या. पण वटवाघळांना मारून करोना विषाणू नष्ट होणार नाही. वटवाघळं नसतील तर हे विषाणू आणखी दुसऱ्या प्राण्यांमध्ये आसरा शोधतील.......